लक्ष्मी पूजन
अश्विन अमावास्येला लक्ष्मी चे पूजन करतात.खरे पहाता महा लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे पण तिचे स्वतःचे असे एक वेगळे स्थान आहे.महा विष्णू जगत् पालक देवता अाहे तर महालक्ष्मी ही समृद्धी,ची देवता आहे. सामान्य अर्थाने लक्ष्मी म्हणजे पैसा-अडका, सोने, चांदी, थोडक्यात ज्या गोष्टी श्रीमंती या स्वरूपात मोडतात त्या गोष्टींचा वाचक शब्द असे आपण मानतो. पण पुराणांमध्ये अष्टलक्ष्मीचा उल्लेख आढळतो म्हणून
१)आदी महालक्ष्मी
२) धन लक्ष्मी
३)धान्य लक्ष्मी
४)संतान लक्ष्मी
५)गज लक्ष्मी
६) वीर लक्ष्मी
७)विजय लक्ष्मी
८) विद्यालक्ष्मी

अशा प्रकारे जीवन समृद्ध करणारी देवता म्हणजे लक्ष्मी होय.
लक्ष्मी किंवा महालक्ष्मी चे रूप अत्यंत सुंदर तेजस्वी आहे. ती चतुर्भुज आहे. तिच्या मागच्या दोन हातात कमलपुष्पे आहेत तर डाव्या हातात धन कुंभ आहे.उजव्या हात आशीर्वादार्थ उचललेला आहे.ती कमळाचे बसलेली आहे.तिच्या अंगावर दागिने आहेत.बाजूला दोन हत्ती आपल्या सोंडेने चव-या ढाळत आहेत.
बरेचदा महाविष्णूंचे पाय चेपताना लक्ष्मीचे वर्णन करतात.
आश्विन. अमावास्या लक्ष्मी चा अवरतरण दिन आहे.समुद्र मंथनातून निघालेल्या चौदा रत्ना पैकी लक्ष्मी हे एक रत्न आहे.समुद्र देवता तिचे पिता आहेत. ती स्वभावाने चंचल आहे असे सगळे म्हणत असतात.कवी तर तिच्या एका जागी न टिकण्याच्या स्वभावावर हल्ला करतात
असे म्हणतात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र रहात नाहीत. एका कवीने हा प्रश्न थेट लक्ष्मीलाच विचारला तिने फारच सुंदर उत्तर दिले आहे
असे म्हणतात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र रहात नाहीत. एका कवीने हा प्रश्न थेट लक्ष्मीलाच विचारला तिने फारच सुंदर उत्तर दिले आहे
कवी हे कमले! तू अडाण्याला
धन देतेस. विद्वानांचा द्वेष
का करतेस?
लक्ष्मी अरे!मी नाही चंचल
आहे. नाही स्वैर
व्यवहार करणारी
नाही.अडाणी,मूर्ख
मला
आवडत ही नाहीत
पण विद्वान हे
विद्वत्तेचं मुळे मान्य
होतात मग माझ्या
शिवाय अडाण्याला
माझ्या शिवाय गती
नाही.
धन देतेस. विद्वानांचा द्वेष
का करतेस?
लक्ष्मी अरे!मी नाही चंचल
आहे. नाही स्वैर
व्यवहार करणारी
नाही.अडाणी,मूर्ख
मला
आवडत ही नाहीत
पण विद्वान हे
विद्वत्तेचं मुळे मान्य
होतात मग माझ्या
शिवाय अडाण्याला
माझ्या शिवाय गती
नाही.
विनोदाचा भाग सोडल्यास हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कमी शिकलेले लोक मेहनतीने पैसा मिळवत असतात.असो लक्ष्मी देवीचे वाहन घुबड आहे.
अशी महालक्ष्मी एक तडफदार स्त्री अाहे ती जगत् कल्याणा साठी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करते अंबाबाई होऊन दुष्ट संहारही करते.ती आपल्या पतीने केलेली प्रतारणा सहन करीत नही.
करवीरलक्ष्मीची कथा अशी आहे. महाविष्णूने पद्मावतीशी विवाह करताच ती कोल्हासुराचा वध करण्यासाठी कोल्हापुरात आली असता तिकडून परत जात नाही. सूर्यदेवाकरवी परत येण्या बाबतचा महाविष्णूचा निरोप ती शांतपणे ऐकून उलट निरोपात जगत् कल्याणासाठी जगाच्या अंता पर्यंत करवीरात निवास करणार असे ठाम पणे सांगते.आणि पद्मावतीचा निरादर न करता तिरूपतीहून आणलेली मानाची साडी स्वीकार करून भक्ताची यात्रा सफल करते.

लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी-गणेशाचे पूजन केले जाते.वास्तविक महालक्ष्मी बरोबर महाविष्णूंची पूजा करतात, महालक्ष्मी ही गणेशाच्या आई सारखी आहे.त्यासाठी एक मनोरंजक कथा आहे.
पूर्वी एक साधूमहाराज लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करीत होते. साधूमहाराजांनी सर्वसंग परित्याग करूनही लक्ष्मीची उपासना करणे सुरू ठेवले.तपश्चर्याचे फल म्हणून. महालक्ष्मी प्रसन्न होऊन इच्छितफलप्राप्तिरस्तु असा वर त्या साधू महाराजांना मिळाला. त्यानुसार त्या प्रदेशाच्या राजाने त्यांना दरबारात मंत्रिपद दिले.साधू महाराजांना आपल्या पदाचा गर्व झाला. त्यांनी ताजमहाल पाडून नवीन महाल बांधण्याची आज्ञा केली.राजाने नाराजीनेच हो म्हटले महालात एक गणेशमूर्ती होती.त्या मूर्तीचे ध्यान आवडले नाही म्हणून त्याने ती मूर्ती काढून टाकण्याचे आदेश दिले.त्या आदेशाने विघ्नहर्त्या गजाननाचा अपमान झाला गजाननाची अवकृपा झाली.राजाची मर्जी उतरल्याने त्याने साधूमहाराजांना बंदी बनवले आणि कारागृहात डांबले.
तेथे साधू महाराजांनी परत लक्ष्मीदेवीला प्रसन्न करायचा प्रयत्न सूरू केला.देवीने त्यांना दृष्टांत दिला तुम्ही गणेशाचा अपमान केला आहे त्याला प्रसन्न करून घ्या साधूने गणेशाची आराधना करून गणेशाला प्रसन्न करविले. त्या दिवसापासून लक्ष्मीपूजनाचे दिवशी लक्ष्मी-गणेशाचे पूजन केले जाते.
खरेतर लक्ष्मी घरी आल्यावर माणसाची बुद्धी भ्रष्ट होण्याची शक्यता असते. मकाराची बाधा होऊ नये म्हणून बुद्धीची देवता श्री गणेशाचे पूजन करून बुद्धी मकार बाधित होऊ नये म्हणून प्रार्थना करायची असते.
ही सुंदर, वैभवशाली, शक्तिशाली महालक्ष्मी आजही घराघरातून गृहलक्ष्मीच्या रुपाने निवास करते आहे.
ही सुंदर, वैभवशाली, शक्तिशाली महालक्ष्मी आजही घराघरातून गृहलक्ष्मीच्या रुपाने निवास करते आहे.
लक्ष्मीचा निवास या ठिकाणी असतो असे सिद्धिलक्ष्मी स्तोत्रात सांगितले आहे.
या श्री पद्मवने कदंब शिखरे
राजगृहे कुंजरे श्वेतेचाश्वयुते
वृषेचयुगले यज्ञेच युपस्थिते
शंखे देवकुले नरेंद्र भवने
गंगातटे गोकुले साश्री
तिष्ठतु सर्वदा मम गृहे
भूयात् सदा निश्चला
अर्थात जी लक्ष्मी कमळवनात,कदंबाच्या झाडाच्य. टोकावर,राजपरिवारात, हत्तीच्या ठिकाणी पांढ-या घोड्या च्या ठिकाणी,बैलजोडीच्या ठीकाणी,यागीय स्तंभाच्याठिकाणी, शंखात,देवळात,राजाच्या घरात,गंगा किनारी,गाईच्या गोठ्यात, निवास करते ती माझ्या घरात स्थिर राहो.

आजच्या रात्री धर्माने जुगार खेळण्यास परवानगी दिली आहे.

लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment