गर्दीतली माणसं
काॅलेजमधून कन्सेशन घेऊन मी थिसिसच्या कामासाठी गेले होते. काम अपेक्षेपेक्षा लवकरच आटोपले. साधारण दोन अडीच वाजले होते.विचार केला आता परत काॅलेजला जाण्यापेक्षा घरी जाव.
व्हिटीला ठाणा ट्रेन गाठली.लेडीज फर्स्टक्लास मधे कोणीच नव्हते.त्यामुळे जेण्टसच्या डब्यातच बसले. मध्य रेल्वेलाइनला इतकी कमी गर्दी फारच कमी वेळेला पाहायला मिळते नाहीतर तिन्ही त्रिकाळ. ट्रेन ओसंडून वहात असतात. काही वेळा तर अस वाटत वांती होताना जस डचमळून पोटातली घाण बाहेर पडते अगदी तसच ट्रेनच होत असणार.माणसांच्या अजीर्ण झाल्याने ती डचमळून माणसांना आपल्या पोटातून बाहेर फेकत असणार
आजचा दिवस अगदी मना जोगता गेला होता.मी शांतपणे विंडोसीट पकडून बसले होते.माणसात असून मिळालेली शांतता भावली होती.ट्रेन सुरू होणार तोच एक त्रिकूट म्हणजे दोन मुलगे आणि एक मुलगी धावत ट्रेन मधे चढली.हुश्श S करत तिघेही माझ्या मागच्या बाकावर बसले होते.
हाय ब्रो कितने साल बाद यार!हाँ यार स्कूल के बाद सात सालके बाद मिले है वाॅट्स अप क्या करते हो. मुलीने विचारले. कुछ नही यार आँख बंद करके जिंदगीके पीछे दौड रहा हूँ। ए तू क्या कर रही है। तू तो डाॅक्टर बनना चाहती थी ना?हाँ बन भी गयी.अब इंटर्नशीप कर रही हूँ। ए पण हा कोण?अरे हा माझा डाॅक्टर फ्रेण्ड आहे. व्हेरी जिनियस परसन आहे.हे डाॅक्! हा माझा स्कूल बडी.अबे साले मेरे बारेमे सब पूछा आपने बारेमे बताना जरा.
क्या सुनना चाहती है तू मेरी शादी नही हुई अभी तो म्हणाला तू पण ना.अगदी तसाच आहेस. ग्रो अप बेबी.अब अपने दिन है। हा हा अपने दिन है या हम दीन है।
मला संवादात्मक रस वाटू लागला. अरे आज वाटले होत ठाण्यापर्यंत शांत बसेन पण ए चुडैल तू भेटलीस.अबे ओ फँटम सिधे बोलना क्या हुआ है।
अरे मम्मी का रोज का किचकिच यार.अरे शाळेत होतो तेव्हा मम्मीला फर्स्ट रँक हवा होता.तो आला तर काय फक्त ८५%मार्क आहेत ९०अप हवेत.चल आपलीच आई आहे काय मागते ९०अप परसेंट ना.म्हणून जीव तोडून अभ्यास केला.फर्स्ट रँक पण मिळवला आणि ९७%पण मिळवले आता वाटले ममा खूष असेल.पण ती हवरटा सारखे मार्क मागतच होती.मी ही ती आणि पापा खूष व्हावा म्हणून जीव तोडून अभ्यास करत होतो. अरे डिक्सटिंगशन मधे पास झालो त्यांच्या म्हणण्याची प्रमाणे एम.बी.ए पण केल.नोकरीला लागलो पहिल दणदणीत पॅकेज घेतल.म्हटल आता तरी हिटलर-मुसोलिनी हसतीत. मला माझ्या हाॅबी साठी वेळ देता येईल.पण तिकडे पण माशी शिंकली.
आता सेटल होण्यासाठी सेव्हिंग्ज कर म्हणून बाबा मागे लागतो.तर माझ्या मैत्रीणीचा मुलगा यु.एस ला असतो.तू ही जा अस ममी म्हणते अरे मला इकडून कुठेही जायचं नाही.पण तिला कोण समजावणार.घरात हुंडईची कार आहे.पण ममाला मर्सिडीस हवीय.तर कोकणात आबांच एक घर आहे,गिरगावात चाळीत दोन घर आहेत.आम्ही ठाण्यात राहातो आहोत ते घर असताना मी बेटर फ्यूचर साठी पुण्यात इनव्हेस्टमेंट कराव अस बाबाच म्हणण आहे.अरे त्या साठी सकाळ पासून रात्री पर्यंत धावतोय.पण दोघे खूष नाहीत ते नाहीतच.
साल आता जर यु.एस्.चा चान्स लागला ना तर परत इकडे येणारच नाही. काय लाईफ आहे साला फक्त चक्रात फिरायच.
खरच बाबाच्या लाईफ छान होत गिरगावातून फोर्टला आॅफीसला जायचं सहा वाजता घरी आला की मस्त मजेत लांब फिरायला जायचं.संध्याकाळी पाय पसरून टी.व्ही पहायचा रात्री ममाबरोबर एक राऊंड मारायची.
इथे साल पर्सनल लाईफच नाही राहील.फक्त आॅफीस,प्रोजेक्ट, टार्गेट,घर,गाडी,पैसा यातच फिरतोय नुसता. मला ट्रेकला जायचं आहे पण टार्गेट फीनिश केल्या शिवाय जाता येणार नाही. आणि ममी पापाच्या इच्छा कमी होत नाहीत. लहानपणी आजी मारूतीच्या शेपटाची गोष्ट सांगायची ना तस झालत. मागण्यांच्या शेपटाची लांबी वाढतच आहे.
छोड यार तुझ बोल काय चालले आहे. तो म्हणाला. तुम्ही मुली तुम्हाला कोणी धारेवर धरत नाही.तुम्हीच बाबा,भाऊ,नवरा यांना पकडता. बस हां बस तुला काय कळणार.मला एम.एस करायच आहे.पण मग लग्नाला उशीर होईल. तो पर्यंत बाबा रिटायर्ड. होईल त्या आत माझ शिक्षण आणि लग्न व्हावे म्हणून आई खटपट करतेय. तिच्या मते योग्यवयात लग्न आणि मूल झाल की बाईला त्रास होत नाही. त्यामुळे कुठेही गेली तरी तिची शोधक नजर होतकरू डाॅक्टर शोधत असते. अरे फॅमिलीमधे लग्नाला गेल की अस वाटत पळून जाव त्या काकवा,आत्या,माम्या यांच्या वा-याला उभ राहू नये.सतत लग्न,लाडू,पेढे याच्याच गोष्टी. मी काय शिकते,त्यात काय चॅलेंजिस आहेत. हे मला कोणी विचारतच नाही सारखे लाडू आणि पेढे कधी देणार ग तू ! अस बेंबीच्या देठापासून कोकलतात.यातून कोणी अतिउत्साही नातेवाईक खरच एखाद प्रपोजल पाठवतो.आणि आई बाबाला वेठीला धरून सारखे नेते. मी करीयर, शिक्षण या बाबत ते दोघे सीरियस नाहीत अस नाही म्हणणार मी पण कॅज्युअलपण नाहीत.शिक्षण हव,त्याच कौतुकही आहे.पण वागणूक त्यांच्या टर्म्स कण्डिशन्स वर हवी. सतत न येणारा स्वैपाक,न येणारी काम या वरून बोलणी खावी लागतात.त्यातून जर नाईट लागली तर आई तीन चार वेळा आणि बाबा दोनदा तरी फोन करतो.एव्हरीबडी लफ्स अॅड मी. मला काय कसाब धरून नेणार आहे का? अस म्हणून तिघेही टाळ्या देऊन हसू लागले .
काय म्हणतोस. आमच बर असत.सतत घरी जाताना टेन्शन असत आज आई काय करेल याच.
मी ऐकत होते.मनात विचार येत होता.आपण मुलांना अशाश्वतीच देतो आहोत का?की स्पर्धेत फक्त पळवत आहोत.आपल्या आई-वडीलांनी आपल्याकडून कसलीही अपेक्षा केली नाही.त्यामुळे त्यांच्या अपेक्षांचे ओझी आपण वाहिली नाही.तरीही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याच की.घरापासून लांब जाऊन रहावे अस आपल्याला कधीच वाटले नाही.
मग आजच्या पिढीला आपण काय देतो केवळ स्पर्धाखोर वृत्ती,मुळातच आकसत गेलेला कुटुंबाचा परिघ,आणि कमी होणारी नातेवाईक मंडळी त्यातही जर केवळ मी माझ्या मुलाला घडवल या आत्मप्रौढी पायात येणाऱ्या मानसिक कमकुवतपणाला जबाबदार कोण.आपणच ना?मग पुढची पिढी बेजबाबदार कशी.असा प्रश्न मनाला सतावतच होता.उत्तर शोधायला किती वर्ष जातील हे मला माहित नव्हत कदाचित काळच त्याच उत्तर असणार होत आणि आहे.
पण मला एक समाधान होत पुढची पिढी स्वार्थी,निखात्री,आणि निष्प्रेम नाही.ती थोडी गोंधळलेली आहे.योग्य मार्गदर्शनाखाली कार्यभाग साधेल. त्यासाठी आमच्या पिढीतला अहंकार आणि स्वच गाण कमी केल आणि त्यांच्याशी संवाद साधला तरच हे शक्य आहे.आजची पिढी आपल्या विचारांशी प्रामाणिक आहे.तिला बुद्धीच वरदान आहे.परंतु तिची अवस्था पंख कापलेल्या पक्षा प्रमाणे करण्यात आम्हीच कारणीभूत आहोत.
माझी उतरायची वेळ झाली होती तिघेही थोडे शांत बसलेले दिसले आता तिसऱ्या मुलाला कंठ फुटला होता.अरे भाय! आप दोनो ऐसा नेगेटिव्ह क्यों सोचते हो.क्या अपने माँ-बाप को उनकी जिंदगी जिनेका अधिकार नही है क्या?कितने दिन ती हम उनपर बोझ बनेंगे.आपण आपल्या हिमतीने जगाव, कोणी आपल्याला हसू नये,लाचार म्हणूनये यासाठीच हे सगळ आहे असा विचार करा ना? आपण जेव्हा संपूर्ण स्वतंत्र होऊ तेव्हाच. माँ बापू आपला स्वतःचा विचार करतील.त्यांना तो विश्वास तरी येऊद्या.ब्रो डोण्ट गेट डिसापाॅइंटेड. त्यांच्या बाजूनही विचार करा..ते जर स्वार्थी असते.किंवा आपण त्यांना नको असतो तर अॅबाॅरशनचा अाॅपशन त्यांना ओपन होता.पण तस त्यांनी केल नाही. ते आपल्या गरजा बाजूला ठेऊन आपल्या गरजा भागवत होते.ब्रो ठाण्याच घर घेण्या ऐवजी तुझ्या बाबाबी मर्सिडीस घेतली असती तर तू अजूनही चाळीतल्या लहानशा जागेत असतास.आजच्या कम्फर्टस तुला मिळाल्या नसत्या. छोडो यार! लेक्चर द्यायच नाहीय पण त्यांचाही विचार शांतपणे करा.
ए चुडैल तुझे माँ-बाबू कीती वर्षात लाँग व्हेकेशनला गेलेत ते सांग ग?तो म्हणाला मी सातवीत असताना आम्ही तिघे मनालीला गेलो होतो.नंतर नाही. मग त्यांना तस करयला कोणी सांगितल होत का?तो म्हणला.नाही! ती म्हणाली.मग ए डंबो! ते का नाही गेले?त्याने विचारले.
माझ्या परीक्षांमुळे!तिन सहज उत्तर दिल. मग जर तुझ लग्न लवकर करून फ्रीली त्यांना एनजाॅय करायच असल तर? हाँ यार आमच्या लक्षात आलाच नाही हा पाॅइंट. दोघेही म्हणाले. दॅटस् व्हाय आय अॅम जिनियस. तिसरा काॅलर ताठ करीत म्हणाला.पण त्यात गर्वाचा थोडाही अभिनिवेश नव्हता.होता तो फक्त समंजसपणा.
मी पूर्णतः अवाक झाले.किती वेगळा विचार करीत होते मी . पण मित्रानच नेगेटिव्हीटी काढून टाकली.कोण म्हणेल यांना थिल्लर गोंधळलेले.
कदाचित त्यांच्या आईन किंवा वडीलांनी हे ऐकल तर त्यांचे डोळे निश्चित पाणावतील.
म्हणतात ना
बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्
ही उक्ती मला मनापासून पटली आणि मी माझ्या स्टेशनला उतरले.
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान