चारित्र्य आणि व्यक्तीमत्व
नेहमीच्या व्यवहारात आपण चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व हे वापरतो. माणूस स्वच्छ चारित्र्याचा उमद्या व्यक्तीमत्त्वाचा आहे
काय आहेत हे शब्द. इंग्रजीत आपण PERSONALITY म्हणजे व्यक्तीमत्व व CHARACTER म्हणजे चारित्र्य हे सर्वसाधारण अर्थ आपण समजत असतो.पण खोलवर अर्थ पहाता
चारित्र्य म्हणजे सद्गुण अंगी बाणवणे हेतुपुरस्सर वाईट गोष्टी दूर लोटणे. मनाला बांध घालून फक्त आणि फक्त चांगल्या,उत्तम गुणांचा ध्यास घेणे. तर
व्यक्तीमत्व म्हणजे polished behavior. वागणुकीतील उत्तमता. जेणे करून
मार्दव,दाक्षिण्यसारख्या गोष्टी आपल्या वागणूक,वावरणे यातून दिसाव्या लागतात. थोडक्यात सांगायचे तर शिष्टाचार संमत वावरणे.आपल्या मूळस्वभावाला हेतुपुरस्सर अडवून केलेले आचरण अशी व्यक्तीमत्वाची ढोबळ व्याख्या करता येईल
याला पंचतंत्रात नितीशास्त्र म्हटले आहे. माणसाच्या आचरणाचे शस्त्र. ज्यात कसे /काय बोलावे.कसे हसावे,अगदी बसावे कधी व कुठे केव्हा हसावे कसे हसावे ज्यातून आपल्या मनातील विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत अधोरेखित अर्था सह पोहोचतील याचा विचार म्हणजेच व्यक्तिमत्वाचा विचार.
बहुतेक वेळा आपण व्यक्तीमत्व म्हणजे माणसाची शारिरीक ठेवण असा संकुचित अर्थ घेत असतो.म्हणजे त्याची उंची,वर्ण,नाकडोळे पण केवळ इतकेच व्यक्तीमत्व नसते. तर त्या व्यक्तीची बरोबरीच्या,कनिष्ठ,व वरीष्ठ व्यक्तीशी असलेली वागणूक ही त्याच्या व्यक्तीमतत्वाचा आरसा ठरते.
व्यक्तीमत्व,आणि चारित्र्य या संकल्पनांचे मानसशास्त्रा नुसार विभाग पाडण कठीण वाटत जरी असल तरी अशक्य नाही.
स्वभाव हा मूलतः म्हणजे जन्मजात असतो पण आलेले अनुभव,कौटुंबिक,पार्श्वभूमी आणि समाजातील पत, यावर. माणसाचा स्वभाव ठरतो. कालमान,परीस्थिती नुसार त्यात बदल अपेक्षित असतात. किंबहुना जेव्हा हे बदल होतात ते बरेचदा कायमस्वरूपी असतात.पण चिडणे,रागावणे, अगदी रडणे या हंगामी गोष्टी कधीमधी हजेरी लागते.पण ह्या गोष्टी हंगामी च असतात.त्या कालांतराने निघून जातात.
येथेच व्यक्तिमत्व विकासाची सुरवात होते.त्याबरोबर समाजात वावरणे हा हेतू धरून आपल्या वागणुकीला मॅनरिझमची जोड देवून सौजन्यपूर्ण (कित्येकदा वरवरची वाटणारी) वागणूक. हे विकसित व्यक्तिमत्वाच गमक आहे.
या मागचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करणे
"A word "IMPOSSIBLE" HIM SELF SAYS" I M POSSIBLE " या नुसार वागणे हे मुख्य. त्या अनुषंगाने शिस्त,संवाद,माणसे जोडण्याची पद्धत,क्षमा,-शासन-करणे, या गोष्टींचा सकारात्मक उपयोग म्हणजे व्यक्तीमत्व विकासाची सायको थेरपी आहे.
जसे म्हणतात ना "चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात होई"
व्यवस्थापन शास्त्रातील. 'Four c's' हा सिद्धान्त सगळ्या प्रकारे वापरून स्वतःची उर्जितावस्था प्राप्त करून घेणे. आणि समाजच्या प्रगतीचा विचार करणे म्हणजे चारित्र्य आणि व्यायक्तिमत्व विकासाचा योग्य संगम याचे उत्तम उदाहरण म्हणजे "श्री रतन टाटा."
पौराणिक आणि ऐतिहासिक काळात हा विषय सर्व सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेर होता पण राजाच्या शैक्षणिक अभ्यास क्रमात तो नेहमीच असे.
आजकालच्या काॅर्पोरेट जगासारखच वातावरण हे राजाच्या दरबाराचा अविभाज्य भाग. असे. त्याला रोज आपल्या कामाच्या निमित्ताने हजारो व्यक्तीना भेटावे लागते.त्यातील काही गोष्टी,व्यक्ती इतक्या विचित्र असतात की त्यांच्याशी बोलताना कपाळावर आठी उमटू न देणे अगदी अशक्य असते.तसेच काही संताप जनक विषय जे अत्यंत ज्वलंत असतात.येथे राग संताप येणे अपरिहार्य. असते.अशावेळे साठी व्यक्तीमत्वावर संस्कार करून त्याला आपल्या राग,लोभ,आनंद,दुःख या विकारावर ताबा ठेवणे योग्य कालमान,परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यक्त होणे आणि योग्य शब्दात व्यक्त होणे म्हणजेच व्यक्तीमत्व होय. थोडक्यात काय तर नकारात्मक गोष्टींचे सकारात्मक रुपांतर करून आपल्यायोग्य वातावरण निर्मिती करणे होय.
भारतीय संस्कृतीने याच गोष्टींची शिकवण धर्माच्या शर्करावगुंठीत गोळीतून दिली.कारण माणसाच्या मानसिकते नुसार त्याला मरणपूर्व जीवन मरणोत्तर हवे असल्यास पुण्य करीत रहावे.म्हणजेच काय तर अनुशासित आणि सकारात्मक जगणे होय पण धर्म ही अफूची गोळी आहे असा विचार करून माणसे हा विचार टाळत रहातात
अशापद्धतीन ज्यांनी स्वभावात आणि वागणूकीत सकारात्मक बदल घडवले ते आजही संस्मरणीय आहेत
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान