Tuesday, December 18, 2018

गर्दीतला माणूस

गर्दीतली माणस
                          
                   काॅलेज तर्फे काही मुलांना घेऊन जे.जे.हाॅस्पिटल मधे जायचं होत.तिकडचा कार्यक्रम आटोपायला आठ साडे आठ वाजले होते.तेव्हा मुलुंडला जाव की गिरगावात या दोलायमान अवस्थेत होते.

               बरोबरची मूल समंजस होती.ती म्हणाली आम्ही सगळी ठाण्याच्या पुढे जाणार मॅडम तुम्ही मुलुंडला उतरा.काही जे.जे.मधली आणि काही पोदार मधली मूल अशी आमची वरात भायखळा स्टेशनवर पोहोचली. उलट्या सी.एस.टी.कडे जाणाऱ्या ट्रेनला आम्ही बसायच ठरल.तेव्हा बरोबरच्या मुली म्हणाल्या मॅडम ठाण्याच्या पुढे ट्रेन पूर्ण रिकामी होते.लेडीज मधे कोणीच नसत तेव्हा आपण जेण्टस् मधे चढूया मुलुंडला उतरता येईल कारण मुलुंडला बरच पब्लिक उतरत.

              उलट्या ट्रेन मधे बसल्याने अगदी राईट साईट विंडो मिळाली होती.सकाळपासून म्हणजे सकाळी ७.४० पासून जे चक्र सुरू होत ते आत्ता पर्यंत सतत चालू होत. त्यात वा-याची मंद पण ट्रॅक्सवर असलेल्या सुगंध,दुर्गंध घेऊन झुळूक आली तीही सुखावून गेली.मुलांच म्हणण्या पेक्षा भावी डाॅक्टरांची सेमिनारवर चर्चा चालली होती.मला मात्र त्यात काही इंटरेस्ट नसल्याने माझे डोळे आपसूक मिटले.मी झोपले नव्हते पण शांत बसले होते.ट्रेन भायखळ्यालाच बराच वेळ थांबून होती. कोणतीतरी लांबपल्लयाची गाडी निघून गेल्यावर ट्रेन सुरू झाल्याचा धक्का बसाला.
                 मस्जिदबंदरला ट्रेन लागतच होती माणसं पटापटा उड्यामारून जागा पकड होती. भाईसाब व्ही.टी.क्या? सीट देना असे सौदे चालू असतानाच ए टाईमपास आजा बे इधर असा मुलांनी गलका केला.

              मी डोळे उघडले.माझ्यासमोर किरकोळ अंगयष्टी असलेला.ज्याला अशक्त म्हणता येईल असा साधारण २०/२२ वर्षाचा मुलगा  पाठमोरा उभा होता. त्याने घातलेले कपडे इतके ढगळ होते किंबहूना तो अत्यंत बारीक असल्याने कपडे इतके ढगळ वाटत होते की या मुलाच्या मापाचे कपडे शिवण म्हणजे शिंप्याची कमाल आहे असे वाटत होते.

                बरोबर असलेल्या मुलाने त्याला विचारले. "ए टाईमपास दी हुई दवा लेता है क्यारे! हाँ भाई लेता है.और माँ को भी देता है। माँ को उपयोग हुआ भाई.उसका गुढघेका दुख कम हुआ। माझ्या कडे वळून तो म्हणाला दीदी व्हीटी क्य? तेवढ्यात. माझ्या बरोबरच्याने सांगितले टाईमपास ये आपली मॅडम है। मला त्यांच्या मराठी हिंदी एकत्र बोलण्याची मजा वाटत होती.तेवढ्यात गाडी व्हिटी स्टेशनला लागली.पटापटा उड्या मारणारी माणसे हाय टाईमपास,हे टी.पी.ब्रो,क्यारे टाईमपास!अस अनेक भाषांत,अनेक आवाजात त्याचा पुकारा होत होता.त्यावरून त्याची पाॅप्यूलॅरिटी समजून येत होती.

              तेवढ्यात एक भेळवाली आणि चिकूवाली चढली. क्या मावशी  अाज मोसंबी नही लाई क्या? अरे टाईमपास डोका नको खाऊ धंदा होऊ दे.अस म्हणत ती पुढे जाणार तोच मी मुलांना म्हटले अरे तिच्याकडून चिकू घ्या!भेळवाली कडून भेळ पण घ्या सगळे खाऊ.मुलांनी घेतली पण त्याच वेळी टाईमपास तिकडून जात असलेला पाहताच मी माझी भेळ त्याला दिली आणि मला दुसरी करून दे असे बाईला सांगितले.

                  मूल सांगत होती मॅडम हा म्हणजे एन्टरटेनमेंण्टच कंप्लिट पॅकेज आहे.जरा थांबा थोड्या वेळात सुरू होईल. खरोखर गाडी सुरू झाली आणि कोणीतरी ओरडला ए टाईमपास आज क्या दिखाएगा रे! तो माझ्याकडे वळला मला म्हणाला "मॅडम आपने मुझको भेल चिकू खिलाया.ये टाईमपास आपको कुछ दिखाएगा खूस कर देगा. " अरे ये खाली बकबक करता रहेगा कुछ नही करेगा. तो देखो !अस म्हणत तो मधे उभा राहिला. आणि शोले पासून ते क् क् क किरण पर्यंत सगळे डायलाॅग अँक्शन. सहीत करून दाखवत होता.सांगणारा कुर्ल्याला उतरला तेव्हा बरोबरच्या जे.जे चा मुलगा त्याला म्हणाला.ए टाईमपास अब बस हो गया बैठ जा. बसल्यावर त्याला पाणी प्यायला दिल.

                क्यूँ करता है ये पागलपन! देख कितना थका है तू. तो आपल्याशीच बोलल्या सारखा बोलू लागला. अरे भाय क्या बोलू घरमें आपुन तीन लोग माँ बापू और मैं पर बापू साला पुरा बेवडा उसने घरबार फूंक डाला जैसेतैसे करके माँ ने अपून को दसवीतक पढाया.  मै सुबु उठके पेपरला लाईन डालता है दो घंटा दूध का लाईन भी डाला उसने एक अंकलने मेरेकु  कुरीयर लाईन मे डाल दिया.अरे जाम मेहनत करके काम किया बापूने गिरवी रखा झोपडा छुडाया. रात देर से सोया सुभे जल्दी उठा दश बजेसे अख्खा मुंबई घुमके पार्सल पहुचाया.अब दो महिना पयले झोपडा छुडाया.अंकलने बोला वैसा माँ के नाम पे किया  अभी बापू कुछ नही कर पाएगा

               मी अगदी आवाक झाले याच वय काय? किती ह्या जबाबदाऱ्या?
अरे डाॅक्टर आपून सब लोग सुबहसे बाहेर रहता है.अरे साला पायाला टायर लावून दौडते है आपून के घरपर शांती मिलता नही.कमसे कम कुछ क्षण लोगोको हसानेका पुण्य मिळता है ना. नाहीतर फक्त दुख अडचणी पैसेकी चणचण क्या? टाईमपास म्हणाला
तुझ्या तब्येतीची काय? अरे डाॅक्टर फिकर काय को रे.अभी अच्छा तब्येत बनाएगा. माँ को बहु मंगता है.

              या मुलाची जीवनदृष्टी आणि तत्वज्ञान माझ्या पचनी पडत नव्हत. विविध वयोगटातली अनेक माणसं पाहत होते.जगण्याच्या शर्यतीत धावताना होणारी दमछाक अनुभवत होते पण त्यातही स्वतःला झोकून देण काय असत आणि कस असत हे जणू टाईमपासन दाखवले.

            पुढच्या मीटिंगच सेशन चार महिन्यांनी होत मला वाटले आज परत टाईमपास दिसेल भेटेल आणि परत त्याचे ते डायलाॅग तिच बडबड ऐकता येईल पण तो मुलगा म्हणाला मॅडम गेल्या महिन्यात साधारण तापाचे निमित्त होऊन टाईमपास वारला.

               मी सुन्न झाले.काय वय होत त्याच जास्तीत जास्त पंचवीस वर्ष.काय संबंध होता माझा त्याचा पण तो जगण्याची तत्वज्ञान शिकवून गेला.

      त्याने आनंद सिनेमातला म्हणून दाखवलेला डायलाॅग आठवत होता
बाबूमोशाय ये दुनिया एक रंगमंच है और हम सब उसकी कठपुतलियाँ मूल विचारत होती मॅडम मुलुंडलाच जाणार ना.नाही मी गिरगावात जाते.टॅक्सी शोधा अस मी सांगितले पण मी माझी नव्हते.

                  वडिलांशी बोलल्यावर मी जरा माणसात आले.ते ही मला सांगत होते गर्दीत अनेक प्रकारची माणसं असतात.

- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्टान

No comments:

Post a Comment