श्रावण महिना
मासात मास श्रावण मास असे श्रावण महिन्याचे वर्णन केले जाते.पाहिले तर हिंदू वर्षाचा पाचवा महिना या खेरीज श्रावण महिन्याची माहिती उपलब्ध होत नाही.मग श्रावण म्हणजे काय? या महिन्याला सर्वाधिक महत्त्व का दिल जात याच उत्तर शोधत असताना काही संदर्भ समोर असले.
श्रावण महिना हा परंपरेने प्रमाणे पौर्णिमेला श्रवणनक्षत्र असताना आरंभ होतो. वास्तविक श्रवण या शब्दाचा ऐकणे हा अर्थ सर्व विदीत आहे. त्याच बरोबर श्रवण म्हणजे आजूबाजूला उगवणारे कोवळे गवत असाही अर्थ आहे. खरोखर किती चपखल अर्थ आहे.अगदी बालकवी देखील सांगतात
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
ज्याच्या नावातच हिरवळीचा आभास आहे असा निसर्ग सौंदर्याने नटलेला महिना म्हणजे श्रावण महिना
भगवान शिव ही या महिन्यातील आराध्य देवता असते.कारण देवशयनी एकादशी पासून सृष्टीची पालक देवता भगवान महाविष्णू योग निद्रेच्या आधीन असतात.तर सृष्टीची निर्मिती देवता पितामह श्री ब्रह्मदेव चैत्रापासून काम करून अताच कुठे विसावलेले असतात.नवीन निर्माण झाल अाहे.जुन्याचा विनाश किंवा नाहिसे करण्याचा अधिकार हा भगवान शिवांचा.आषाढ महिनाभर अहोरात्र अव्याहत पणे कार्यरत असलेल्या भोळ्या सांबाला प्रसन्न करवून सृष्टीचा उत्पात थांबवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य ठरते.म्हणूनच शिवपूजन करून त्याला फुले,फळे,(शिवामुठी व्रताने)धान्य,जल अर्पण करून त्याची आराधना केली जाते.जेणे करून उत्पाताची तीव्रता कमी होईल.
असे म्हणतात समुद्र मंथनातून श्रावणमहिन्यातच चौदा रत्ने निर्माण झाली त्या मधे अमृत तर आलेच पण हालाहल हे विष देखील बाहेर आले. मानव हितार्थ ते नष्ट करण्यासाठी शिवाने पिवून टाकले.त्याच्या या ऋणातून प्राणिमात्र कधीच मुक्त होणार नाहीत.त्याच्या विषयी कृतज्ञता म्हणूनच की काय श्रावण महिन्यात शिव व्रते करीत असतात.
श्रावणातील इतर व्रते पाहता ती रक्षक व्रते आहेत.जिवतीका पूजन कुटुंब रक्षणासाठी,बुध-बृहस्पती पूजन बुद्धी आणि ज्ञान रक्षणा साठी.नाग पूजन हे धान्य तसेच प्राणीमात्र रक्षणा साठी. म्हणजेच जे निर्माण झाले आहे.त्याचे रक्षण शिवाने करावे कारण महाविष्णू योग निद्रेत आहेत. अशी माणसाची अपेक्षा असते.
व्यावहारिक दृष्टीने पहाताना श्रावण महिन्यात फारशी शारिरीक कष्टाची कामे नसतात.माणूस रिकामा असेल तर खाली दिमाग शैतान का घर या न्यायाने तो आपली चाकोरी सोडून सतत खणे-पिणे,ऐषारामी जीवन यावर अापले लक्ष केंद्रित करेल. त्याच्या गाई-उशी-मम्मम या वृत्तीला आळा घालणे क्रमप्राप्त होते.म्हणूनच व्रत वैकल्यांची बेडी त्याच्या पायात अडकवली आणि त्याच्या मनाला बांध घातला. त्यानंतर परत शेतीची कामे सुरू होतातच त्यामुळे त्याचे चित्त त्या कामांवर एकाग्र होते.रिकामपणी कलह, मरामारी अशाही गोष्टींनी समाज जीवन विस्कळीत होऊ नये म्हणूनच की काय व्रत वैकल्यांची रेलचेल श्रावणात केली.
पूजन समारंभाने सामंजस्य टिकेल आणि दुराचाराला आळा बसेल अशाच शिव म्हणजे पावन विचारांनी शिव आराधना आणि व्रत. निसर्गातील उपद्रवी घटकांना देखील देवत्व बहाल करून यांच्या साथीने निसर्ग निर्मित सामग्रीने देवतार्चन करीत निसर्गाचा आनंद घेणे माणसाला शक्य व्हावे हे श्रावणाचे काम आहे.
नियमित अर्थाने श्रवण म्हणजे ऐकणे म्हणून देवदेवतांचा महिमा ऐकवणारा महिना म्हणजे श्रावण
निर्मिती प्रक्रियेतील वाढ या क्रियेत साठी उपयुक्त असे सूर्याचे अधिष्ठानही या महिन्याबरोबर असते.म्हणूनच आदीत्य राणु बाई सारख्या सौर व्रताची साथ संगत घेऊन माणसाच्या जीवनात आनंदाची हिरवळ पेरणारा महिना म्हणजे श्रावण.
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteअनोखी श्रावण महती
ReplyDelete