Saturday, August 4, 2018

आकार

आकार

गाण म्हटले की सरगम घोटताना नेहमीच आकारात घोटायला सांगतात.सर्व सामान्य पणे आकार म्हटले की आपल्या समोर आकृती हा शब्द येतो. खरतर आकार ही चा गायनाच्या शास्त्रातील एक अस शस्त्र आहे.जे साधला तर ते गायकाला स्वर्गीय आनंद देत नाहीतर पूर्ण पणे धराशायी करून टाकत. काय आहे हा आकार?  स्वर लावण्याची पद्धत. होय आवाज तापवण्यास साठी सतत. सरगमाचस रियाज करण कदाचित कंटाळवाणेपणाच असत.त्यावेळी ओठ थोडे विलग करून आ या अक्षराने स्वरसाधना करणे म्हणजे आकार लावणे म्हटले जाते.
 
तानेची माळ गुंफताना  प्रत्येक स्वराचा मोती व्यवस्थित ओवण्याचा धागा म्हणजे आकार जेव्हा हे सर उलगडून लागतात तेव्हा श्रोत्याना ते आकारात लपेटत जातात.
 
आकार लावण्याच्या अनेक पद्धती आहेत.काही जण आSSSअसा स्वर लावतात तर काही जण नोSSम्  तोSSम् करीत स्वर लावतात.थोडक्यात कायतर तुम्ही अनुनासिक सोडून ज्या अक्षराच्या सहाय्याने स्वर प्रदर्शन कराल ते अक्षर म्हणजे आकार अस ढोबळमानाने म्हणता येईल.पण हे अक्षर निवडताना आणि त्याच प्रकटीकरण projection करत असताना "आ" हेच अक्षर योग्य वाटते.
 
कोणीही विचारेल केवळ "आ" हेच अक्षर का?याला उत्तर देताना थोड गाण्याच्या व्याकरणात शिराव लागत.जेव्हा "आ" या अक्षराचा उच्चार होतो.तेव्हा गळ्याच्या आतील भाग उघडल्याची जाणीव होते. स्वर घुमल्याचा भास होतो.  त्यामुळे स्वरकंपनात  कसलीही अडचण न येता सहजपणे तळ्यातून बाहेर पडतात.रियाजाने हे इतके सुलभ होते की जसे मोती दो-यातून ओघळतात तसे स्वर सहज सुलभपणे एकामागोमाग एक समान वजनाने  गायले जातात.
 
हा आकार एका चांगल्या गायकाची शक्ती असतो.तो साधण्यासाठी विशेष प्रयास करावे लागतात.काहीवेळा तर जिभ रूमालाने पकडून आकाराचा रियाज करतात.कालांतराने हा आकार सहज लागतो.नाहीतर ब्रह्मांडाची  आठवण करून देतो.
 
असा हा आकार माणसाच्या गायन कलेला आकार तर देतोच पण गायकाचे आयुष्य आकारात आणतो. म्हणतात ना -
 
"आकार घासा आकार लावा आणि रागाला आकार द्या"
 
आजचे आकार महात्म्य येथेच संपले रजा घेते. 
 
-तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment